आमदार शिवाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मलगेवाडी येथे विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य व खाऊ वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

31 July 2026

आमदार शिवाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मलगेवाडी येथे विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य व खाऊ वाटप

चंदगड / प्रतिनिधी

    चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील (भाऊ) यांच्या वाढदिवसानिमित्त शिवाभाऊ युवामंच, मलगेवाडी यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास अधिक सुकर व्हावा तसेच त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.

    या कार्यक्रमास सौ. राजश्री लक्ष्मण गावडे (सदस्य, जिल्हा परिषद कोल्हापूर), सौ. श्रीलक्ष्मी संजय जाधव (भारती) (अध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना समिती, चंदगड), आर.एस.एस. कार्यकर्ते व समाजसेवक शंकर भेकणे तसेच भाजप कार्यकर्ते विलास पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

    शिवाभाऊ युवामंचचे अध्यक्ष पुंडलिक नाईक, उपाध्यक्ष अनिल पाटील, सचिव भुजंग म्हादगोंडे, सल्लागार रवळू शिवगोंडे व दशरथ शिवगोंडे, सदस्य आप्पा चिलगोंडे, प्रशांत पाटील, सुनील शिवगोंडे, अनिल नाईक तसेच महिला बचत गटांच्या सदस्य व ग्रामस्थांच्या सहकार्याने हा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला.

    यावेळी उपस्थित मान्यवरांनी अशा समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी आमदार  शिवाजीराव पाटील (भाऊ) यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य व भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment