
कुदनूर येथे तंटामुक्त कमिटी आयोजित गुणवंतांचा सत्कार सोहळा प्रसंगी मान्यवरांसोबत विविध क्षेत्रातील गुणवंत
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
महात्मा गांधी तंटामुक्त कमिटी, कुदनूर (ता. चंदगड, जि. कोल्हापूर कार्यकाल सन २०२५–२६) यांच्या वतीने सोमवार दि. ०३ ऑगस्ट २०२६ रोजी श्री सिद्धेश्वर हायस्कूल, कुदनूरच्या सांस्कृतिक हॉल मध्ये गावातील विविध क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या गुणवत्तांचा गुण गौरव सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष सुरेश (राजू) वसंत पवार हे होते. यावेळी उपस्थित गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. संगीता सुरेश घाटगे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, तंटामुक्त कमिटीचे सदस्य, गावातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते सुरेश घाटगे तसेच कुदनूर गावातील मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
अंगणवाडी ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात शिक्षण, स्पर्धा परीक्षा, क्रीडा, कराटे, पोलीस, अग्निवीर, आरोग्य सेवा, बँकिंग, मार्गदर्शन अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या ६० गुणवंतांचा सन्मानचिन्ह, पदक, प्रमाणपत्र व पुष्प देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर कोरी यांनी केले.
करण्यात आलेल्या मध्ये केंद्रप्रमुखपदी निवड झालेले सागर प्रकाश हेब्बाळकर व विनायक भरमु रेडेकर, सुरेश बुधाजी कोटगी, वैद्यकीय क्षेत्रातून पीएच.डी. पदवी संपादन केलेल्या कुमारी प्रिती रवींद्र हंप्पन्नावर, NEET मध्ये निवड झालेला कु. सारंग राजेंद्रकुमार हदगल, SRPF व मुंबई पोलीस, मुंबई पोलीस, अग्निवीर, आरोग्य विभाग- किरण मुतकेकर, कराटे कु. अनिरुद्ध पवार, विनोद आंबेवाडकर, बँक संचालकपद तसेच विविध राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला.
याशिवाय नवोदय विद्यालय प्रवेश, महाराष्ट्र शिष्यवृत्ती, मंथन स्पर्धा तसेच विविध शैक्षणिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचाही विशेष गौरव करण्यात आला. यामध्ये कुमारी माही धनंजय खवनेवाडकर, नेत्रा मोहन मोहनगेकर, आन्वी अनिल आंबेवाडकर, प्रांजल यलाप्पा पाटील, जुही दिगंबर खवनेवाडकर यांच्यासह सर्व गुणवंतांचे अभिनंदन करण्यात आले.
हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक रमेश कुंभार यांनी मार्गदर्शन केले. सत्कारमूर्ती सागर हेब्बाळकर, डॉ. प्रीती हंपन्नावर, सन्नप्पा कुरबेटी आदींनी आपल्या मनोगत तंटामुक्त कमिटीने आयोजित केलेल्या या उपक्रमाबद्दल ऋण व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात सुरेश पवार यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच संस्कार, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी जोपासून उच्च ध्येय गाठावे, असे आवाहन केले. यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी ही आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महात्मा गांधी तंटामुक्त कमिटी चे उपाध्यक्ष शिवाजी ओउळकर सदस्य, हणमंत मोहनगेकर, दशरथ आंबेवाडकर, सिद्राम आंबेवाडकर, धनंजय खवनेवाडकर, ईश्वर गवंडी, श्रीगेश बिर्जे, दयानंद जाधव, केदारी नौकुडकर, सिद्राम गुंडकल, प्रकाश हेब्बाळकर, श्री सिद्धेश्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. तंटामुक्त कमिटीचे सचिव तथा गाव कामगार पोलीस पाटील नामदेव लोहार यांनी आभार मानले.
सध्या राज्यभरातील अनेक गावांमध्ये तंटामुक्त कमिटी निवडी प्रसंगी स्वतःच तंटा करणाऱ्या तंटामुक्त कमिट्या कुदनूर येथील तंटामुक्त कमिटीचा आदर्श घेतील का...? अशी चर्चा मात्र या कार्यक्रमावरून परिसरात होताना दिसत होती.
No comments:
Post a Comment