चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड बस डेपोमध्ये नुकत्याच दाखल झालेल्या ५ नवीन बसपैकी कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झालेल्या ३ नवीन 'राजमाता जिजाऊ' बसेस आजपासून चंदगडकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. उर्वरित २ बसेसची प्रक्रिया पूर्ण होताच त्या उद्यापासून सेवेत रुजू होणार आहेत. या नूतन 'राजमाता जिजाऊ' बसांचे पूजन महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी शांताराम बापू पाटील, नगराध्यक्ष सुनिल काणेकर, उपनगराध्यक्ष सौ. आयेशा नायकवाडी, डेपो व्यवस्थापक सतिश पाटील, माजी जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, भरमाणा गावडे चंदगड मंडल अध्यक्ष विशाल बल्लाळ, सुरेश सातवणेकर, अशोक गडदे, संजय गांधी निराधार समिती अध्यक्षा सौ. भारती जाधव, विष्णू गावडे, डॉ. परशराम गावडे, अमेय सबनीस, सौ. एकता दड्डीकर, सौ. माधवी शेलार, सौ. शितल कट्टी, सौ. गायत्री बल्लाळ, सौ. सुचिता कुंभार, अजिंक्य पिळणकर, सचिन सातवणेकर, अबुझर मदार, परेश पाटील, सचिन नेसरीकर, संदीप कोरेकर, श्रीशैल नागराळ, ऋषिकेष कुट्रे तसेच चंदगड बस डेपो कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments:
Post a Comment