चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय एकता दिनानिमित्त चंदगड पोलीस ठाण्याच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
शनिवारी (दि. ३१) सकाळी ६.३० वाजता चंदगड पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय एकता दिनाची शपथ घेण्यात आली.
यानंतर राष्ट्रीय एकता व अखंडतेचा संदेश सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने चंदगड शहरातून एकता रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार आणि अकॅडमीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि देशाची अखंडता टिकवून ठेवण्याचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला. हा उपक्रम चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

No comments:
Post a Comment