![]() |
| दयानंद वसंत पाटील |
चंदगड : प्रतिनिधी
तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील प्रसिद्ध LIC विमा सल्लागार दयानंद वसंत पाटील यांना MDRT (USA) 2027 चा बहुमान प्राप्त झाला आहे. या यशामुळे दि. ६ ते ९ जून २०२७ दरम्यान अमेरिकेतील ऑर्लॅंडो, फ्लोरिडा येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली आहे.
विमा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दयानंद पाटील यांनी यापूर्वीही दोन वेळा COT (एका वर्षात तीन MDRT) तसेच अनेक वेळा MDRTचा बहुमान मिळवला आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे चंदगड, आजरा, गडहिंग्लज तसेच बेळगाव सीमाभागात त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
द मिलियन डॉलर राउंड टेबल (MDRT) ही जीवन विमा आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील आघाडीच्या व्यावसायिकांची जागतिक, स्वतंत्र संघटना म्हणून ओळखली जाते. या संस्थेचे सदस्यत्व मिळविण्यासाठी संबंधित वर्षातील ठरावीक उत्पादन व व्यवसाय निकष पूर्ण करावे लागतात.
दयानंद पाटील गेल्या २३ वर्षांपासून विमा व्यवसायात कार्यरत आहेत. ग्रामीण भागात विमा व्यवसाय करताना येणाऱ्या आव्हानांवर मात करत त्यांनी विम्याबाबत जनजागृती व प्रसारासाठी कोवाड आणि बेळगाव येथे सुसज्ज कार्यालये तसेच प्रशिक्षित कर्मचारीवर्गाची व्यवस्था केली आहे. ग्राहकांना उत्कृष्ट सेवा, योग्य मार्गदर्शन आणि विमा नियोजनाचा सल्ला देण्यावर त्यांनी सातत्याने भर दिला आहे.
या यशामध्ये वरिष्ठ शाखाधिकारी सौ. शुभदा बिंदगे, सनंदन गायकवाड, किरण अवचिते तसेच विकास अधिकारी अरुण उबाळे यांचे मार्गदर्शन आणि ग्राहकांचे सहकार्य लाभल्याचे दयानंद पाटील यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment