दिग्विजय देसाई व विशाल बल्लाळ यांची भाजपच्या अनुक्रमे माणगाव व गवसे मंडल अध्यक्षपदी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

26 April 2025

दिग्विजय देसाई व विशाल बल्लाळ यांची भाजपच्या अनुक्रमे माणगाव व गवसे मंडल अध्यक्षपदी निवड

दिग्विजय देसाई

विशाल बल्लाळ

चंदगड : सी एल वृत्तसेवा 
   भारतीय जनता पक्षाच्या चंदगड तालुक्यातील मंडळ अध्यक्षांच्या निवडी नुकत्याच करण्यात आल्या. माजी रोजगार हमी योजना राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांच्या व तालुकाध्यक्ष शांताराम पाटील यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. चंदगड तालुक्यातील माणगाव मंडळ साठी कागणी (ता. चंदगड) येथील दिग्विजय रवींद्र देसाई यांची तर गवसे मंडळ अध्यक्षपदी चंदगड येथील विशाल मनोहर बल्लाळ यांची निवड करण्यात आली. 
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल शिवनगेकर यांनी केले. मान्यवरांनी नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अरुण देसाई, अशोक कदम, प्रताप सूर्यवंशी, अनिल शिवनगेकर, भावकू गुरव यांच्यासह महेश पाटील, भरमू मेणसे, श्रीकांत नेवगे, यांची उपस्थिती होती. विशाल बल्लाळ व दिग्विजय देसाई यांनी वरिष्ठांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला पात्र राहून भाजप संघटना बळकटीसाठी तालुक्यातील सर्व बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख यांच्याशी योग्य संपर्क व समन्वय ठेवून प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment