पहेलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ कोवाड येथे मुस्लिम बांधवांचा मोर्चा, पाकिस्तानी राष्ट्रध्वजाची होळी - चंदगड लाईव्ह न्युज

28 April 2025

पहेलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ कोवाड येथे मुस्लिम बांधवांचा मोर्चा, पाकिस्तानी राष्ट्रध्वजाची होळी


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 
      जम्मू आणि काश्मीर राज्यातील पहेलगाम येथे २३ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी निष्पाप २७ पर्यटकांना गोळ्या घालून ठार केले. या भ्याड हल्ल्याने संपूर्ण जग हादरून गेले. या घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे. यात कोवाड परिसरातील मुस्लिम बांधव ही मागे राहिले नाहीत. आज दि. २८ रोजी कोवाड परिसरातील कालकुंद्री, कुदनुर, राजगोळी खुर्द, तळगुळी, किणी आदी गावांतील मुस्लिम बांधवांनी एकत्र येत कोवाड गावातून निषेध फेरी काढली. यावेळी तिरंगा राष्ट्रध्वज घेऊन वंदे मातरम, भारत माता की जय, दहशतवादी व पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. शेवटी छत्रपती शिवाजी महाराज चौकात हल्ल्यात मृत्यू पावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी पाकिस्तान च्या राष्ट्रध्वजाची होळी करून घटनेतील दोषींना पकडून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. 
    यावेळी तळगुळी दिंडलकोप चे उपसरपंच जुबेर काझी, आदम मुल्ला, उस्मान मुल्ला, अयुब मुल्ला, इम्तियाज अल्लाखान, मुनीर मुल्ला आदींसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment