आसगाव पाटीलवाडीत वादळी वाऱ्याने पाच घरांची छपरे उडाली, यावेळी आलेल्या पावसामुळे धान्य व प्रपंचिक साहित्यांचे लाखोचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

26 April 2025

आसगाव पाटीलवाडीत वादळी वाऱ्याने पाच घरांची छपरे उडाली, यावेळी आलेल्या पावसामुळे धान्य व प्रपंचिक साहित्यांचे लाखोचे नुकसान

आसगाव पाटीलवाडीत वादळी वाऱ्याने पाच घरांची छपरे उडाली, यावेळी आलेल्या पावसामुळे धान्य व प्रपंचिक साहित्यांचे लाखोचे नुकसान

चंदगड : सी एल वृत्तसेवा 
  आसगाव पैकी पाटीलवाडी ता. चंदगड येथे काल दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेले. वादळा नंतर आलेल्या पावसात घरातील धान्य व प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्याच्या रुपाने आलेल्या या आसमानी संकटामुळे सर्व पाच कुटुंबे उघड्यावर पडली आहेत.

    नुकसान झालेल्या ग्रामस्थांत एकनाथ महादेव पाटील यांच्या घराचे छप्पर उडून गेले. यावेळी झालेल्या पाऊस व पडझडीमुळे त्यांच्या घरातील टीव्ही, फ्रिज, भात व नाचना इत्यादी धान्य, वॉशिंग मशीन आदी साहित्य असे एकूण २ लाख ५० हजार चे नुकसान झाले. याशिवाय नंदकुमार महादेव पाटील यांच्या घराचे पत्रे उडून ८० हजार चे नुकसान झाले. 
     

    दत्तात्रय पांडुरंग पाटील यांच्या घरावरील पत्रे उडून त्यानंतर आलेल्या पावसात भात व नाचना धान्य व प्रापंचिक साहित्य असे २ लाख २० हजार रुपयांचे नुकसान, वसंत पांडुरंग पाटील यांच्या घरावरील पत्रे उडून ७० हजार रुपयांचे नुकसान 
     

     तर मोहन पांडुरंग पाटील यांच्या घरावरील पत्रे उडून घरातील प्रपंचिक साहित्य असे ७५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याच्या अंदाज व्यक्त करण्यात आला असून शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment