आजरा : गोपाळ गडकरी/ सी एल वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील मडिलगे येथील पूजा गुरव यांचा खून केल्याप्रकरणी संशयित आरोपी सुशांत गुरव याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी सबळ पुरावे उपलब्ध करावेत व सुशांत गुरवला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी. अशी मागणी अतिग्रे या पूजाच्या माहेरचे ग्रामस्थ व जय जवान जय किसान संघटनेने मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन सहाय्यक पोलिस निरिक्षक नागेश यमगर यांना देण्यात आले.
या निवेदणात म्हटले आहे की, आमच्या गावची माहेरवाशीन पूजा गुरव यांचा दोन दिवसापूर्वी खून झाला त्या अनुषंगाने तिच्या नराधम नवऱ्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी. न्यायालयात सबळ पुरावे सादर करून जास्तीत जास्त शिक्षा करावी अशी मागणी करणेत आली आहे. सदर निवेदनावर संदिप बिडकर, कृषांत गुरव, अक्षय गुरव, तानाजी पाटील, संपत गुरव, संग्राम जाधव, श्रीकांत बिडकर यांच्यासह अतिग्रे ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
No comments:
Post a Comment