चंदगड : सी एल वृत्तसेवा
मराठा सेवा संघासह अन्य सर्व ३३ कक्षां्या बळकटीकरण करण्यासाठी संघटनात्मक पुनर्बांधणी करण्याचा निर्णय केंद्रीय कार्यकरणीच्या नजीकच्या काळात वेळोवेळी झालेल्या बैठकांमध्ये विचार विनिमयानंतर घेण्यात आला आहे.
याकरीता गाव, शहर, महानगर, तालुका, जिल्हा व विभागीय स्तरांवरील पदाधिकारी व कार्यकारीणी सदस्य निवडीबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या अनुषंगाने वरील निकषांनुसार जून्या/नव्या सर्वच इच्छूकांनी विहीत नमुन्यात स्वत:ची परिपूर्ण माहिती भरून व स्वाक्षरी करून आपले अर्ज प्रदेशाध्यक्ष, मराठा सेवा संघ तसेच शिवश्री लडके, केंद्रीय कार्यालयीन सचिव, नागपूर यांचेकडे पोस्टाने, ऑनलाइन, व्हाट्सअप द्वारे किंवा आपल्याला शक्य होईल अशा माध्यमाद्वारे तात्काळ सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच ज्यांना जिल्हाध्यक्ष यांचे मार्फत सादर करावयाचे असतींल त्यांनी आपले अर्ज मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष महिपती बाबर यांच्याकडे पाठवावेत. ते इकडून मुदतीत वरीष्ठांचेकडे सादर केले जातील. अशी माहिती स्वतः जिल्हाध्यक्ष महिपती बाबर यांनी दिली आहे.
सर्व अर्ज शुक्रवार दि.९ मे २०२५ अखेर पोहोच होतील अशा रीतीने सादर करणेचे आहेत. तसेच अकलूज, जि. सोलापूर येथील मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय महा अधिवेशन प्रसंगी शनिवार दि.१० मे रोजी सकाळी १०-०० ते दुपारी १-०० वाजेपर्यंतच्या पहिल्या सत्रांमध्ये स्वतः उपस्थित राहुन समक्षही देता येतील.
उशिरा प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार होणार नाही किंवा अन्य कोणामार्फत येणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. याची नोंद कोल्हापूर जिल्ह्यातील इच्छुकांनी या गांभीर्याने घेऊन विहित नमुन्यातील अर्ज विना विलंब वेळेत व मोठ्या संख्येने सादर करावेत.
सर्व कक्षांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, हितचिंतक तसेच नव्याने सहभागी होऊ इच्छिणाऱ्या युवक-युवती, सामाजिक कार्यकर्ते, मराठा समाज बांधव, माता-भगिनींसह सर्व प्रकारच्या आस्थापनांमध्ये सेवारत अधिकारी/कर्मचारी आदींनी कुणाच्याही निमंत्रणाची वाट न पाहता स्वेच्छेने पूढे येऊन सामाजिक चळवळीमध्ये सहभाग घेऊन आपल्या समाजाप्रती ऋण व्यक्त करावे असे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष महिपती बाबर, कुरुंदवाड, जिल्हा कोल्हापूर यांनी केले आहे.
मराठा जोडो अभियान अंतर्गत जिजाऊ रथयात्रा-२०२५ च्या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यातून मराठा सेवा संघाशी नव्याने जोडलेल्या सर्व समाज बांधव-भगिनी यांना कार्यरत सर्वच पदाधिकाऱ्यांनी या विषयाची माहिती अवगत करून देऊन संबधितांचे अधिकाधिक संख्येने अर्ज सादर करणेसंबंधी प्रवृत्त करावे असेही आवाहन करणेत आले आहे.
No comments:
Post a Comment