आजीच्या मरणोत्तर नेत्रदानामुळे दोन अंधांना मिळाली दृष्टी - चंदगड लाईव्ह न्युज

20 May 2025

आजीच्या मरणोत्तर नेत्रदानामुळे दोन अंधांना मिळाली दृष्टी



बेळगाव : सी एल वृत्तसेवा 

      आंबेडकर गल्ली, गौंडवाड, (ता. जि. बेळगाव) येथील रहिवासी शतायुषी आजी यशोदा गंगाराम पाटील (वय १०२) यांचे सोमवार दि. १९ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित ६ मुली, ४ मुलगे, नातवंडे आणि पणतवंडे असा मोठा परिवार आहे. विशाल कन्स्ट्रक्शनचे मालक विजय पाटील आणि गौंडवाड ग्रामपंचायत सदस्य कल्लाप्पा अष्टेकर यांच्या त्या आजी होत. रक्षा विसर्जन गुरुवारी सकाळी वाजता गौडवाड येथे होणार आहे.

   यशोदा पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी बेळगाव सिव्हिल हॉस्पिटल मध्ये नेत्रदान करण्याचा निर्णय घेत तो अमलात आणला यामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळाली. १०२ वर्षांच्या आजी निधनानंतरही दोघांना मिळालेल्या दृष्टीच्या रूपाने जिवंत राहिल्या आहेत.

No comments:

Post a Comment