![]() |
किटवाड येथे जीर्णोद्धार झालेल्या श्री लक्ष्मी मंदिरात ओटी भरण्यासाठी महिलांची झालेली गर्दी |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
ग्रामस्थ व भाविकांच्या देणगीतून जीर्णोद्धार झालेल्या किटवाड (ता. चंदगड) येथील ग्रामदेवता श्री लक्ष्मी मंदिरचा वास्तुशांती, कळसारोहन व मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम हजारो भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक वातावरणात संपन्न झाला. दि. २१ ते २४ मे २०२५ अखेर चार दिवस चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमाची सांगता २४ रोजी महाप्रसादाने झाली.
![]() |
किटवाड येथे लक्ष्मी मंदिर वास्तुशांती महाप्रसाद प्रसंगी उपस्थित माजी रोहयो मंत्री भरमूआण्णा पाटील, यशवंत सोनार, भारती जाधव सह मान्यवर व भाविक |
उत्सव काळात मूर्ती व कळस मिरवणूक, मूर्ती धान्याधिवास, जलाधिवास, पंचरत्न व शय्यायाधिवास, कलश व तोरण मिरवणूक, वास्तुशांती, संकल्प विधी, गणेश पूजन, होम हवन, चौथरा पूजन, गाभारा पूजन, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, पाषाणपूजन, कळसारोहन आदी धार्मिक कार्यक्रमांसह रोज सायंकाळी महिला हरिपाठ, रात्री भजन व कीर्तन, प्रबोधनात्मक एकनाथी भारुड आदी कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमानिमित्त गावात आलेल्या हजारो माहेरवाशीणींचे मानपान कार्यक्रम लक्षवेधी ठरला. दि. २३ रोजी कळसा रोहन कार्यक्रमानंतर भुतरामट्टी येथील मुक्ती मठाचे अधिपती श्री शिवसिद्ध सोमेश्वर महास्वामी यांनी उपस्थित भाविकांना प्रबोधनात्मक मार्गदर्शन करून मंत्रमुग्ध केले. २४ रोजी सकाळी देवीला नैवेद्य दाखवून महाआरतीनंतर मंदिर लोकार्पण, ओटी भरणे व महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी माजी रोहयो मंत्री भरमूआण्णा पाटील, माजी आमदार राजेश पाटील, माजी सभापती यशवंत सोनार, चंदगड तालुका सरपंच संघटना संस्थापक अध्यक्ष एम. जे. पाटील, भारती जाधव, अनिता भोगण (सरपंच कोवाड), राजाराम नाईक सरपंच होसूर), संगीता सुतार (सरपंच किटवाड), एस. एल. पाटील, चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, अशोक पाटील (तेऊरवाडी), कालकुंद्री येथील सप्ताह कमिटी सदस्य शंकर सांबरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आलेल्या मान्यवरांचे स्वागत एन. के. पाटील, महेश पाटील, मारुती दळवी, परसू पाटील यांनी केले. कार्यक्रम पार पडण्यासाठी मंदिर बांधकाम कमिटी, ग्रामपंचायत व सर्व संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळांचे कार्यकर्ते, मुंबई ग्रामस्थ मंडळचे सदस्य व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment