चंदगड : सी एल वृत्तसेवा
गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करणारा टोयाटो कंपनीचा ट्रक व त्यातील १,१८,८००/- रुपये किमतीची दारू असा एकूण १६,१८,८००/- रुपये किमतीचा मुद्देमाल चंदगड पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई चंदगड पोलिसांनी ३० एप्रिल रोजी रात्री नऊच्या सुमारास मोटनवाडी- पाटणे फाटा रोडवरील पाटणे गावाच्या हद्दीत केली. मोटर वाडी फाटा येथे हात दाखवून पोलिसांनी थांबण्याचा इशारा केल्यानंतरही टोयाटोचा चालक भरदा वेगाने पुढे गेला त्याचा पाठलाग करत असताना टोयाटो झाडाला धडकून अपघातग्रस्त झाली. यात गाडीचे नुकसान झाले.
याबाबत चंदगड पोलिसांनी मिळालेली अधिक माहिती अशी घटनेतील आरोपी खाजावली अब्दुलसाहब शेख, वय ४८ वर्षे रा. पांडुरंग मंदिर शेजारी होस्पेट, तालुका होस्पेट, जिल्हा बेल्लारी हा आपल्या ताब्यातील टोयाटो कंपनीच्या ट्रकमध्ये महाराष्ट्र शासनाचा कर चुकवण्याच्या उद्देशाने गोवा बनावटीच्या ओल्ड मंक रम, ब्लेंडर स्प्राईड व्हिस्की, मेकडॉल नंबर वन व्हिस्की, रॉयल स्टॅग व्हिस्की, रॉयल चॅलेंज व्हिस्की, रॉयल ग्रँड व्हिस्की, मेंशन हाऊस ब्रांडी, ओल्ड मंक व्हिस्की, रिझर्व सेवन व्हिस्की, बुलेट सेव्हन्टी सेवन फेनी अशा विविध आकाराच्या विविध कंपनीच्या गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या महाराष्ट्र शासनात चा कर चुकवण्याच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करत होता. मोटणवाडी फाटा येथे त्याला पोलिसांनी थांबण्याचा इशारा करूनही वाहन न थांबविता मोटणवाडी फाटा ते पाटणे भरधाव वेगाने जात असताना झाडावर धडकून स्वतः जखमी झाला. व वाहनाच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याने त्याच्यावर भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक हनमंत नाईक यांनी चंदगड पोलिसात दिल्यानंतर घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी वाहनासह मुद्देमाल ताब्यात घेतला. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शितल धवीले करत आहेत.
No comments:
Post a Comment