चन्नेकुपी चे पोलीस पाटील तानाजी कुरळे यांचा पोलीस पाटलांच्या प्रबोधनाबद्दल जिल्हास्तरीय सन्मान - चंदगड लाईव्ह न्युज

08 May 2025

चन्नेकुपी चे पोलीस पाटील तानाजी कुरळे यांचा पोलीस पाटलांच्या प्रबोधनाबद्दल जिल्हास्तरीय सन्मान

 

कोल्हापूर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती कार्यक्रमात लोकराजा शाहू महाराज यांची प्रतिमा देऊन तानाजी कुरळे यांना सन्मानित करताना मान्यवर.

चंदगड : सी एल वृत्तसेवा 
      चन्नेकुपी (ता. गडहिंग्लज) गावचे विद्यमान पोलीस पाटील तानाजी रामचंद्र कुरळे यांनी गेली अनेक वर्षे 'पोलीस पाटील आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य' या विषयावर प्रबोधनपर चळवळ चालवली आहे. त्यांच्या या लक्षवेधी उपक्रमाचे दखल घेऊन राजेश्री शाहू यांच्या १५० व्या जयंती निमित्त कोल्हापर येथील शाहू सलोखा मंच तर्फे त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. 
  ६ मे २०२५ रोजी कोल्हापूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे निमंत्रक निमंत्रक वसंतराव मुळीक, सहनिमंत्रक बबनराव रानगे, व्यंकपा भोसले, डी. जी. भास्कर, बाळासाहेब भोसले, अशोक भंडारे, कादर मलबारी, शिवशाहीर दिलिप सावंत, दिलिप देसाई, ॲड. अभिषेक मिठारी, रफिक शेख, शैलेजा भोसले, संयोगिता देसाई, गीता हसूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
  

No comments:

Post a Comment