![]() |
| मॅरेथॉन स्पर्धा संग्रहित छायाचित्र |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगाव यांच्या वतीने रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी बेळगाव हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती रोटरी क्लब चे अध्यक्ष शशिकांत नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मॅरेथॉन स्पर्धेसाठी विविध वयोगटांसाठी स्वतंत्र गट ठेवण्यात आले आहेत. 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉन साठी वयोगट 18 ते 39, 40 ते 49, 50 ते 59 व 60 वर्षांवरील. दहा किलोमीटर मॅरेथॉन साठी वयोगट 10 ते 35 वर्षे, 36 ते 45 वर्षे, 46 ते 59 वर्षे व साठ वर्षांवरील. पाच किलोमीटर धावणे स्पर्धेसाठी वयोगट 18 ते 39, 40 ते 54 व 55 वर्षांवरील तर तीन किलोमीटर अंतरासाठी 'फन रन' आयोजित करण्यात आले आहे.
नोंदणी केलेल्या धावपटूंना भाग्यवान सोडती द्वारे सोन्याचे नाणे जिंकण्याची संधी मिळणार असून एकूण 3 लाख 80 हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या मॅरेथॉन ची सुरुवात दिनांक 16 रोजी सकाळी 6 वाजता लिंगराज कॉलेज मैदानावरून होईल. स्पर्धा धर्मवीर संभाजी चौक, कॅम्प कॅन्टोन्मेंट बोर्ड, मंडोळी रोड वरून अंगडी कॉलेज येथे समाप्त होईल.
याच कार्यक्रमाचा भाग म्हणून दिनांक 13 व 14 नोव्हेंबर रोजी मिलेनियम गार्डन येथे हेल्थ अँड फिटनेस एक्सपो आयोजित करण्यात आला आहे. रोटरी क्लब आणि डॉक्टर साठे आरोग्यमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या एक्सपो मध्ये आरोग्यविषयक उत्पादने, सेवा पॅनल, चर्चा तसेच मुलांसाठी खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी वायव्य टी टोस्ट अँड कंपनी हे मुख्य प्रायोजक असून नोंदणीची अंतिम तारीख उद्या 10 नोव्हेंबर अखेरपर्यंत आहे. संस्थेच्या स्कॅन कोडद्वारे ऑनलाईन नोंदणी करता येईल. अशी माहिती सचिन कुलगोड यांनी दिली. पत्रकार परिषदेच्या वेळी डॉ. वर्षा साठे, नरेश कुलगोड, लोकेश होंगल, उमेश रामपूरवाडी, निलेश बंग, ऋषभ जाजू, बी. डी. पाटील, अरुण भंडारी यांच्यासह वेणूग्राम रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते. स्पर्धेसाठी गटनिहाय रुपये 1500, 1000, 800 व विद्यार्थ्यांसाठी 200 रुपये प्रवेश फी ठेवण्यात आलेली आहे.

No comments:
Post a Comment