गोवा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यांनी आज ईनाम सावर्डे (ता. चंदगड) येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे चंदगड वासीयांच्या वतीने माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मुख्यमंत्री सावंत यांनी ८४ खेड्यांचे दैवत श्री रवळनाथ देवाचे दर्शन घेतले व मनोभावे प्रार्थना केली.
मुख्यमंत्री सावंत यांनी मौजे कोलिक (ता. चंदगड) ते गोवा राज्यास जोडणाऱ्या रस्त्याचे काम करण्याबाबत निवेदन दिले. सध्या या रस्त्याची पूर्णपणे दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकाचे प्रचंड हाल होत असून या खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे. या अपघातामध्ये निष्पाप लोकांचे बळी जात असून अनेकांना अपंगत्व आले आहे. या रस्त्यामुळे महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण चंदगड तालुका गोवा राज्यास जोडला जाणार आहे. यामुळे दोन्ही राज्यातील व्यापार व दळणवळणास चालना मिळेल. त्यामुळे विशेष लक्ष घालून गोवा राज्य ते महाराष्ट्र राज्याची सिमा असणाऱ्या मौजे कोलिक ते गोवा रस्त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन या रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी विनंती चंदगडवासीयांच्या वतीने केली.
यावर मुख्यमंत्री सावंत यांनी सकारात्मक भूमिका घेत या रस्त्यांचे काम लवकर मार्गी लावण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला. तसेच यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी चंदगड नगरपंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या व युतीच्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या व चंदगड नगरपंचायतीवर भारतीय जनता पक्ष आणि युतीचीच सत्ता यावी यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment