कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्थेचा रविवारी वार्षिक कौटुंबिक स्नेह मेळावा - अध्यक्ष डी. एल. भादवणकर यांची माहिती - चंदगड लाईव्ह न्युज

18 December 2025

कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्थेचा रविवारी वार्षिक कौटुंबिक स्नेह मेळावा - अध्यक्ष डी. एल. भादवणकर यांची माहिती

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा       

दि. 18-12-2025

        कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्थेच्या केवळ सभासदांचा वार्षिक कौटुंबिक स्नेह मेळावा रविवार दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी नवी मुंबई येथील तळ मजला, मजुद्दीन हायस्कूल, सेक्टर ८ ए, ऐरोली नवी मुंबई या ठिकाणी दुपारी ३ वाजता आयोजित केल्याची माहिती अध्यक्ष डी. एल. भादवणकर यांनी दिली. 

    त्या कौटुंबिक स्नेह मेळाव्याला विविध कार्यक्रमांची रेलचेल असेल. यामध्ये नाचगाणी व जल्लोष, धमाल खेळ, भन्नाट स्पर्धा, अस्सल तांबड्या पांढऱ्या कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद, लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांना काही ना काही खास असे या वार्षिक कौटुंबिक स्नेही मेळाव्याचे स्वरूप आहे.  या मेळाव्याला सर्व सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष विशाल पाटील, सचिव प्रकाश तेजम, खजिनदार रणधीर पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment