तिरमाळ शाळेचे अध्यापक शंकर कोरी यांच्या सेवानिवृत्ती निमित्त उद्या दि. २७ रोजी कुदनूर येथे सदिच्छा सोहळा - चंदगड लाईव्ह न्युज

26 December 2025

तिरमाळ शाळेचे अध्यापक शंकर कोरी यांच्या सेवानिवृत्ती निमित्त उद्या दि. २७ रोजी कुदनूर येथे सदिच्छा सोहळा


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

      कुदनूर गावचे सुपुत्र व मराठी विद्या मंदिर तिरुमाळ शाळेचे अध्यापक शंकर सिद्ध बसू कोरी हे ३५ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेतून ३१ मे २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त शनिवार दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सदिच्छा सोहळा पार पडणार आहे.

    मराठी विद्यामंदिर कुदनूरच्या पटांगणात संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान कुदनूरच्या सरपंच सौ संगीता सुरेश घाटगे भूषवणार आहेत.  प्रमुख पाहुण्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या नंदाताई बाभुळकर यांच्या हस्ते कोरी यांचा सेवानिवृत्ती सन्मान होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धनसंपदा नागरी सहकारी बँक गडहिंग्लज चे चेअरमन उदय जोशी यांच्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पमाला जाधव, सामाजिक कार्यकर्ते एम. जे. पाटील माजी जि. प. सदस्य कल्लाप्पा भोगण,  सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील, गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील, उपसरपंच अशोक गवंडी, सेवा संस्थेचे चेअरमन पुंडलिक कोकितकर, चंदगड तालुका सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष वसंत जोशीलकर, राजीव गांधी पतसंस्थेचे चेअरमन पी. बी. पाटील सप्ताह कमिटी प्रमुख प्रकाश कसलकर, तंटामुक्त कमिटी अध्यक्ष राजू पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्व शिक्षक, हितचिंतक व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्रीमती आऊताई ईश्वर नावलगेर, सौ सुमित्रा शिवानंद नावलगेर यांच्यासह शाळा व्यवस्थापन कमिटी तीरमाळ, केंद्र मुख्याध्यापक कुदनूर व केंद्रातील सर्व मुख्याध्यापकांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment