तामिळनाडूतील शिवगंगाई RTC मध्ये ‘ओव्हर ऑल बेस्ट ट्रेनी’ पुरस्काराने तुषार पाटील सन्मानित
संपत पाटी, चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
देशसेवेची तीव्र जिद्द, कठोर परिश्रम आणि अनुशासनाच्या जोरावर बागिलगे गावच्या सुपुत्र कु. तुषार तानाजी पाटील यांनी इंडो–तिब्बत बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत संपूर्ण तालुका, जिल्हा व राज्याचा गौरव वाढवला आहे. तामिळनाडू येथील आर. टी. सी. शिवगंगाई या आयटीबीपीच्या सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण केंद्रात पार पडलेल्या दीर्घकालीन प्रशिक्षणात १२४४ प्रशिक्षणार्थींमधून प्रथम क्रमांक पटकावत त्यांनी ‘ओव्हर ऑल बेस्ट ट्रेनी’ हा मानाचा पुरस्कार मिळवला आहे.
तुषार पाटील यांच्या या यशामुळे बागिलगे गावात आनंदाचे वातावरण असून, ग्रामस्थ, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. देशसेवेसाठी झटणाऱ्या तरुणांसाठी तुषार पाटील यांचे यश “मेहनतीला पर्याय नाही” हा प्रेरणादायी संदेश देणारे ठरले आहे.
.jpeg)

No comments:
Post a Comment