राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन - चंदगड लाईव्ह न्युज

12 January 2021

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

नेसरी वाचन मंदिराच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती साजरी करताना मान्यवर

नेसरी / सी. एल. वृत्तसेवा

      स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त नेसरी (ता. गडहिंग्लज) वाचन मंदिर यांचे वतीने अभिवादन करण्यात आले. 
      राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन  पुंडलिक सुतार व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्रतिष्ठित नागरिक मारुती रेडेकर यांचे हस्ते झाले. यावेळी मनोगतातून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा वारसा व संस्कृती आपण जपुया असे विचार कार्यवाहक वसंत पाटील यांनी व्यक्त केले. आभार ग्रंथपाल शीतल शिंगटे यांनी मानले. यावेळी शंकर शिंगटे, विठल सासुलकर, दौलत रेडेकर व मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment