चंदगड येथे त्रिनेत्र ऑप्टिक्सचा नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर यांच्या हस्ते शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

12 January 2021

चंदगड येथे त्रिनेत्र ऑप्टिक्सचा नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर यांच्या हस्ते शुभारंभ

चंदगड येथील त्रिनेत्र या ऑप्टिकस्चे फित कापून उद्घाटन करताना नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर, बाजूला शोधन देसाई, डॉ. संतोष जाधव, डॉ. विशाल देसाई आदी.

चंदगड / प्रतिनिधी 

    आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित असलेल्या शोरूममूळे चंदगड सह परिसरातील २०ते२५ खेड्यातील नागरिकांची सोय झाली आहे.पूर्वी डोळे तपासणी व चष्मे घेण्यासाठी बेळगाव-गडहिग्लजला जावे लागायचे पण आता  चंदगड येथेच आधुनिक तंत्रज्ञानासह कमी खर्चात सर्व सोयी मिळणार असल्याने हे शोरूम अल्पावधीत नावारुपाला येईल असा विश्वास नगराध्यक्षा सौ. प्राची  काणेकर यांनी व्यक्त केला. त्या चंदगड येथे नव्याने सुरू झालेल्या त्रिनेत्र ऑप्टिकस् च्या उद्धाटन प्रसंगी बोलत होत्या.

      डॉ. संतोष जाधव व डॉ. विशाल देसाई यांच्या हस्ते मशीन पूजन करण्यात आले. शोरूमचे संचालक शोधन देसाई म्हणाले" ``आमच्याकडे उत्तम पद्धतीने आपल्या डोळ्यांची काळजी तर घेतले जाईलच. त्याचबरोबर तयार करून मिळणारे चष्माकडे  फॅशन  म्हणून न बघता यामध्ये अतिशय शास्त्रोक्त पद्धत वापरून तयार केलेल्या लेन्सेस असणार आहेत. याबरोबरच लोकांना माहीत नसलेल्या बऱ्याचशा तांत्रिक व शास्त्रीय गोष्टी यामध्ये असणार आहेत.

       प्रा नंदकुमार पाटील म्हणाले, ``स्वतः बरोबर समाजाचा विचार करून भोवतालची परिस्थिती बदलण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती ठेवून ग्रामीन भागातील तरुणांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता उच्यशिक्षण घेऊन स्वताचा व्यवसाय सुरू करून तालुक्याच्या विकासात आपला हातभार लावावा. या सोयीचा  फायदा चंदगडमधील सर्व नागरिकांनी, तरुणांनी व जेष्ठ लोकांनी करून घ्यावा.

      लक्ष्मी देसाई, एस. बी. पाटील, प्रकाश पाटील, दत्तात्रय देसाई, डॉ. परशराम गावडे, अनंत पाटील, डॉ. जितेंद्र देसाई, डॉ. जगदीश पाटील व नागरिक उपस्थित होते. सुत्रसंचालन वैभव देसाई यांनी केले.
No comments:

Post a Comment