कोदाळी येथे चंदगड तालूका टू व्हीलर मेकॅनिकलनी दिली वाहनधारकांना विनामूल्य सेवा - चंदगड लाईव्ह न्युज

11 March 2026

कोदाळी येथे चंदगड तालूका टू व्हीलर मेकॅनिकलनी दिली वाहनधारकांना विनामूल्य सेवा

  

कोदाळी येथे मोफत दूचाकी दुरुस्ती कॅम्पला उपस्थित असलेले चंदगड तालूका मॅकॅनिक असोसिएशनचे सदस्य

चंदगड / सी एल वृत्तसेवा

चंदगड तालूक्याचे श्रद्धास्थान असणारी कोदाळी येथील श्री माऊली देवीच्या यात्रेनिमित्य चंदगड तालूका टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी बिघडलेल्या हजारो वाहनांना विनामूल्य दुरुस्ती करून सेवा प्रदान केली . सलग दुसऱ्या वर्षी असा विनामूल्य सेवेचा उपक्रम राबवून या असोसिएशनने चंदगड तालूक्यात एक वेगळा पायंडा पाडला आहे.

 संपूर्ण चंदगड सह कर्नाटक व गोवा राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कोदाळी येथील श्री माऊली देवीच्या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरवात झाली महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा राज्यातील लाखो भाविकांनी श्री माऊली देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला.

    चंदगड - गोवा  या राज्य मार्गावर तिलारी घाट माथ्यावर कोदाळी गाव वसले आहे. येथील श्री माऊली मंदिरातील माऊली  म्हणजे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान. नवसाला पावणारी व  सर्व भाविकांचे दुःख नाश करणाऱ्या या देवीच्या उत्सवाला लाखो भाविक येत असतात. पण तिलारी कोदाळी हे ठिकाण घाटमाथ्यावर असल्याने या परिसरात कोणताच मेकॅनिक उपलब्ध नाही .अशातच या यात्रेला हजारो दूचाकी येत असल्याने यातील काही गाड्याचा तांत्रिक बिघाड झाला तर भाविकांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागतो. या सर्वांचा विचार करून या मेकॅनिक असोसिएशनने येथे विनामूल्य सेवेचा कॅम्प लावला. याचा फायदा अनेक भाविकांना झाला. असाच कॅम्प ही असोसिएशन महिपाळगड - देवरवाडी येथील यात्रेवाळी लावून हजारो भाविकांची सेवा करते. 

गाडी नादुरुस्त झाल्यानंतर या परिसरात कोणतीच सोय उपलब्ध नाही. त्यामुळे भाविकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागलो. याचा विचार करून कोदाळी येथे असा कॅम्प घेतल्याने अनेक भाविकांची सोय झाली. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे भाव बघून आम्हा सर्व मेकॅनिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले असल्याचे मत या असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता बाचूळकर यांनी व्यक्त केले.

यावेळी उपाध्यक्ष परशराम पाटील, खजिनदार संजय आडाव, दशरथ पाटील, विश्वास पाटील, जयराज गवस' चंद्रकांत गवस, सट्टूप्पा पाटील, संतोष पाटील यांच्यासह २५ हून अधिक मेकॅनिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment