कोवाड / प्रतिनिधी :
ऊस पिकाचे उत्पादन व गुणवत्ता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, योग्य खत व्यवस्थापन, पाणी नियोजन तसेच रोग-किडींचे प्रभावी नियंत्रण आवश्यक आहे. याच उद्देशाने ओलम (हेमरस) शुगरच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. बिझनेस हेड टी. कन्नम, युनिट हेड एस. राधाकृष्णन व केन हेड सुधीर पाटील यांच्या प्रयत्नातून वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. निलेश मालेकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.
ऊस लागवडीपासून तोडणीपर्यंतच्या विविध टप्प्यांमध्ये घ्यावयाची काळजी, जमिनीची सुपीकता टिकविणे, संतुलित खतांचा वापर, ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे योग्य नियोजन तसेच ऊस पिकावरील रोग व किडींचे वेळीच व्यवस्थापन याबाबत डॉ. मालेकर यांनी सविस्तर माहिती दिली.
यावेळी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतातील अडचणी जाणून घेऊन त्यावर आवश्यक उपाययोजना सुचविण्यात आल्या. बदलत्या हवामानाचा ऊस पिकावर होणारा परिणाम लक्षात घेता शेतकऱ्यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन खर्च कमी व उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा, असे आवाहन करण्यात आले.
‘शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन’ या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील परिस्थितीनुसार थेट कृषी तज्ज्ञांचा सल्ला मिळत आहे. त्यामुळे ऊस उत्पादन व गुणवत्तावाढीसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
यावेळी ऊस विकास अधिकारी नामदेव पाटील, सिनियर केन ऑफिसर संजय पाटील, फील्ड ऑफिसर संजय देसाई, श्रीधर पाटील, संदीप देसाई, सचिन रेडेकर, प्रल्हाद बुच्चे, विलास पाटील, जयसिंग बोरगावकर, बसवाणी भांदुर्गी यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी सुनील मोरे, सत्यपा नाईक, नारायण कोणेरी, संपत सुळगेकर, महादेव धुळा, गोपाळ मोरे, प्रभाकर फोंडे, संजय मोरे, शिवाजी कडोलकर, बबन कडोलकर, विलास कडोलकर, शिवाजी तोंडले, बसवानी गुरव, संतोष मोरे, विनोद कडोलकर, अनिल शिरगुप्पी, महालिंग गस्ती, हणमंत गस्ती, निंगाप्पा पाटील, रानबा पाटील, विष्णू पाटील, बाबू नागोजी कांबळे, कृष्णा पाटील, भरमू पाटील, शिवलिंग डांगे, अनिल पाटील, पांडुरंग पाटील, परशराम मुत्नाले, अशोक व्हकळी आदी शेतकरी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment