![]() |
| श्रीमती लक्ष्मीबाई तुकाराम शिंत्रे |
गडहिंग्लज : सी एल वृत्तसेवा
आपली मुले, मुली व संपूर्ण कुटुंब उच्च शिक्षित करून समाजासमोर आदर्श ठेवणाऱ्या इंचनाळ, (ता. गडहिंग्लज) येथील रहिवाशी मातोश्री श्रीमती लक्ष्मीबाई तुकाराम शिंत्रे (वय- ९३) यांचे सोमवार दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, पणतवंडे असा मोठा परिवार आहे. चंदगड तालुक्यात अनेक वर्षे शिक्षिका म्हणून सेवा केलेल्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका तसेच सध्या वरिष्ठ गटात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योगासनपट्टू अशी ख्याती मिळवलेल्या आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या सौ. गीतांजली धोंडीराम पाटील (गडहिंग्लज) यांच्या तसेच सेवानिवृत्त मोटर वाहन निरीक्षक दिलीप शिंत्रे यांच्या त्या आई होत. तर सेवानिवृत्त मुख्याध्यापक धोंडीराम पाटील यांच्या सासू होत.

No comments:
Post a Comment