![]() |
| माडखोलकर महाविद्यालय चंदगड येथे वंदे मातरम राष्ट्रगीताच्या दीडशे वर्षपूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा. के. एस. काळे सोबत मान्यवर |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
शासनाच्या हर घर तिरंगा उपक्रमाच्या माध्यमातून देशात राष्ट्र प्रेमाचा जागर शक्य होईल! असे प्रतिपादन कोवाड महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. के. एस. काळे यांनी केले. ते खेडूत शिक्षण मंडळ कालकुंद्री संचलित र. भा. माडखोलकर महाविद्यालय, चंदगड येथील राष्ट्रीय सेवा योजना व समाजशास्त्र विभागाच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियान तसेच ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एम. माने होते.
यावेळी पुढे बोलताना स्वातंत्र्यलढ्यात वंदे मातरम् राष्ट्रगीताने अनन्य साधारण भूमिका बजावली होती. असे सांगून राष्ट्रगीत व तिरंगा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, देशभक्तीची भावना निर्माण होऊन भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या गौरवशाली इतिहासाची जाणीव व जपणूक होईल. असा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रध्वज हा केवळ कापडाचा तुकडा नसून देशाच्या स्वाभिमानाचे, त्यागाचे, शौर्याचे आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन देशाच्या विकासासाठी जबाबदार नागरिक म्हणून आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना प्राचार्य माने यांनी 'राष्ट्रभक्ती ही केवळ घोषणांपुरती मर्यादित न राहता ती आपल्या आचरणातून आणि सामाजिक जबाबदारीतून व्यक्त झाली पाहिजे.' असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय एकात्मता आणि संविधानिक मूल्ये जोपासावीत असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. डॉ. शाहू गावडे यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन समाजामध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोहोचवावा असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. ए. डी. कांबळे यांनी केले. प्रा. डॉ. एस. डी. गोरले यांनी आभार मानले. या प्रसंगी प्रा. एन. के. पाटील, प्रा. डॉ. वाय जाधव, प्रा. एस. एन. पाटील, प्रा. व्ही. के. गावडे , प्रा. डॉ. एस. एस. सावंत, प्राध्यापिका डॉ. ए. पी. पाटील, प्रा. वैशाली दानवे , प्रा. डॉ. आर. ए. कमलाकर, पी.पी .धुरी, तुषार लोंढे, अभिजीत कांबळे आदींसह सर्व प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment