![]() |
| विठोबा पाटील |
![]() |
| सौ. सुजाता मनगुतकर |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
मराठी विद्या मंदिर नागरदळे, ता. चंदगड येथे शाळा व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी झालेल्या पालक मेळाव्यात विठोबा पुंडलिक पाटील यांची अध्यक्षपदी, सौ सुजाता मनगुतकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारिणी सदस्य म्हणून आण्णाप्पा विठोबा हदगल, राजू रामू मनगुतकर, अनिल तुकाराम पाटील, बेबी सुनील पाटील, रेखा एकनाथ पाटील, नागनाथ वैजनाथ पाटील, रेश्मा नारायण पाटील, संदीप कृष्णा पाटील, कविता पांडुरंग कांबळे, अंजना अजित सुतार, शिक्षक तज्ञ प्रियंका संजय पाटील, ग्रामपंचायत प्रतिनिधी राजकुमार अशोक पाटील, तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून बाबू पुंडलिक पाटील यांची निवड करण्यात आली.
निवड प्रसंगी माजी उपाध्यक्ष सौ छाया कोकितकर, हणमंत हदगल, विनोद मस्कर, सदस्या दिपाली सुतार, उषा कांबळे आदी सदस्य उपसरपंच एकनाथ पाटील, ग्रामपं. सदस्य पांडुरंग सुतार यांच्यासह पालक वर्ग व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनोहर नाईक यांनी आभार मानले.


No comments:
Post a Comment