मुंबई / विशेष वृत्तसेवा
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या डिसेंबर ते मार्च २०२६ या कालावधीतील २२ वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवार दि. १३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता ९ करोड ३२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर १८ हजार ६४० करोड रुपये वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण १३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता दुरदर्शन वाहिनीच्या डीडी न्युजवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
पी. एम. किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षातून ऑगस्ट ते नोव्हेंबर, एप्रिल ते जुलै, डिसेबर ते मार्च या कालावधीमध्ये ३ हप्ते म्हणजे ६ हजार रुपये दिले जातात.
पीएम किसान योजनेचे आतापर्यंत २१ हप्ते पात्र शेतकऱ्यांना मिळाले आहेत. दिवसेनदिवस या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज करत आहेत. मात्र सद्या काही जाचक अटी असल्यामुळे कागदपत्रे जमा करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. हा हप्ता देशातील सुमारे ९ कोटी ३२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून १८ हजार ६४० करोड रुपये पात्र शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा होणार आहे. ई-केवायसी, ॲग्रीस्टेक किंवा एनपीसीआय न केलेल्या शेतकऱ्यांना २२ व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही.


No comments:
Post a Comment