
नांदवडे (ता. चंदगड) येथे शिमगोत्सवानिमित्त काढण्यात आलेले सोंग.
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
नांदवडे (ता. चंदगड) येथे शिमग्यानिमित्त वर्षीलदार फौजदार व गावडा पाटील यांच्या वतीने शिवगोत्सवानिमित्त विविध बक्षिसांचे आयोजन करण्यात आले आहे. ९ मार्च २०२६ रोजी हि स्पर्धा संपन्न होणार असून त्याच दिवशी गुडदाप्पाच्या सोंगानंतर चव्हाट्यावर बक्षिस वितरण होणार आहे.
स्पर्धेमध्ये प्रवेश खुला व विनामुल्य आहे. विजेत्यांना अनुक्रमे बक्षिसे पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक ₹3333, द्वितीय क्रमांक - ₹2222, तृतीय क्रमांक – ₹1111, चतुर्थ क्रमांक - ₹999, पाचवा क्रमांक ₹888, सहावा क्रमांक - ₹777, सातवा क्रमांक - ₹666, उत्तेजनार्थ - ₹555 अशी बक्षिसे आहेत. पारंपरिक नृत्य, ढोल-ताशा, वेशभूषा आणि सादरीकरण यांना प्राधान्य दिले जाईल. सर्व सोंग प्रेमींना आपला सहभाग नोंदवावा. शिमगोत्सव हा आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि एकतेचा उत्सव आहे. या उत्सवाची शोभा वाढवण्यासाठी आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी फौजदार घराणे वर्षील गावडा यांच्या तर्फे खालीलप्रमाणे बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

No comments:
Post a Comment