![]() |
| विजय कदम |
![]() |
| सौ. स्नेहल वाघमारे |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुका पंचायत समिती स्तरावरील सेवकांच्या सहकारी पतसंस्था पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. यावेळी चेअरमनपदी विठोबा रानबा मुंगुरकर तर शाखा चेअरमनपदी विजय विष्णू कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. योगायोगाने चेअरमन पदाचे दोन्ही मानकरी चंदगड तालुक्यातील कालकुंद्री गावचे आहेत. संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी स्नेहल वाघमारे यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी सुजय येझरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या निवड प्रक्रियेत सदस्य अब्दुलहमीद मुजावर यांनी चेअरमन पदासाठी मुंगुरकर यांचे नाव सुचविले. त्याला रोहिदास पाटील यांनी अनुमोदन दिले. व्हाईस चेअरमन पदासाठी स्नेहल वाघमारे यांचे नाव पांडुरंग मेंगाणे यांनी सुचविले. त्याला महादेव सांबरेकर यांनी अनुमोदन दिले. शाखा चेअरमनपदासाठी विजय कदम यांचे नाव प्रशांत पाटील यांनी सुचविले. त्याला सतीश माने यांनी अनुमोदन दिले. यावेळी संचालक नंदू गावडे, दयानंद मोटुरे, पुनम शिंदे, व्यवस्थापक गणपत सावंत, शाखा मॅनेजर ईश्वर आवडण, सुधीर लांडे, वैशाली गडकरी उपस्थित होत्या. प्रशांत पाटील यांनी आभार मानले.



No comments:
Post a Comment