कोवाड / सी एल वृत्तसेवा
ओलम (हेमरस) कारखाना, राजगोळी खुर्द-चन्नेहट्टी, ता. चंदगड, यूपीएल व नेटाफिम यांच्या संयुक्त विद्यमाने कोवाड येथील राजयोग सांस्कृतिक भवन येथे मंगळवार, दि. २५ रोजी सकाळी १०.३० वाजता उन्नती शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती कारखान्याचे बिझनेस हेड टी. कन्नम यांनी दिली.
या मेळाव्यात नेटाफिम इंडिया शुगरकेन तज्ज्ञ मार्गदर्शक अरुण देशमुख हे ‘ऊस पिकामध्ये ठिबक सिंचनाची गरज व महत्त्व’, यूपीएल शुगरकेन क्रॉप मॅनेजर अमोल आंधळे हे ‘शाश्वत ऊस विकास प्रकल्प’, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. निलेश मालेकर हे ‘ऊस पिकावरील महत्त्वाचे रोग, कीड व त्यावरील उपाय’, तर फायलो अँग्री हॉक टेक्नॉ.चे विपणन व्यवस्थापक विशालकुमार मिरजे हे ‘एआय तंत्रज्ञान आणि ऊस शेती’ या विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी कारखान्याचे बिझनेस हेड टी. कन्नम, युनिट हेड एस. राधाकृष्णन आणि केन हेड सुधीर पाटील उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्याचा सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, यासाठी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन नामदेव पाटील, रणजित सरदेसाई, अनिल पाटील आणि भागोजी लांडे यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment