![]() |
पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना प्राचार्य आर. आय. पाटील बाजूला उपमुख्याध्यापक बोकडे, सुरेश सातवणेकर |
सी. एल. वृत्तसेवा, चंदगड
शिस्त असेल तर चुका होणार नाहीत. बडगा दाखवून शिस्त निर्माण करता येत नाही. स्वतःवर बंधने घालून स्वयंम शिस्त निर्माण करा,असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर यांनी केले. चंदगड येथे न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्युनि. कॉलेजच्या वतीने आयोजित महाराष्ट्र पोलीस वर्धापन सप्ताह निमित्त ते बोलत होते.
प्राचार्य आर. आय. पाटील यांनी प्रास्ताविक करून सामाजिक स्थैर्यात पोलीसांची भूमिका, त्यांचे कार्य, लॉक डाऊनच्या कालावधीत कोरोना योध्ये बनून त्यांनी केलेली सेवा या विषयी माहिती देऊन महाराष्ट्र पोलीस वर्धापन सप्ताह निमित सर्व पोलीस बांधवांना शुभेच्छा देऊन दिल्या.
पोलीस निरीक्षक तळेकर यांनी कायदा तोडणं म्हणजे काय? गुन्हयांचे दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे कोणते, वाहतूकीचे नियम, लायसन्स, इन्शुरन्स, वाहनांचे पेपर, त्यांचे महत्व, माहिलांची छेडछाड, विद्यार्थ्यांकडून घडणारे गुन्हे याविषयी सखोल माहिती देऊन फौजदारी कायदयातील वेगवेगळ्या कलमांची माहिती दिली. एखादयावर अन्याय झाला असेल तर मध्यस्थ अथवा एजंटाकडे मदतीची भिक न मागता सरळ पोलीस स्टेशनला येऊन भेटा असे सांगून पोलीस खात्यातील विविध पदांची माहिती देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
या प्रसंगी उपप्राचार्य ए. जी. बोकडे, ज्युनि. कॉलजचा स्टाफ व विद्यार्थी, रावसाहेब कसेकर, राज किल्लेदार, सूर्यकांत सूतार आदीसह पोलिस कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. अर्चना रेळेकर यांनी केले. आभार पर्यवेक्षक एस. जी. सातवणेकर यानी मानले.
No comments:
Post a Comment