कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
बलभीम तालीम मंडळ व निट्टूर (ता. चंदगड) ग्रामस्थ यांच्यावतीने दरवर्षी गुढीपाडवा निमित्त कुस्ती मैदान होते. सुमारे १०० वर्षांची परंपरा असलेले हे मैदान यंदा गुरुवार दि. १९ मार्च रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे. यावेळी प्रथम क्रमांकाची कुस्ती सनी मदने (क्रांती कारखाना कुंडल) विरुद्ध अनिरुद्ध पाटील (नॅशनल चॅम्पियन सेनादल), द्वितीय क्रमांक ची कुस्ती भरत पवार (कुंडल) विरुद्ध प्रकाश इंगळगी (घोडगीरी), तृतीय क्रमांक ची कुस्ती स्वप्नील शिंदे (कुस्ती संकुल टिटवे) विरुद्ध संजू इंगळी (इंगळगी) चौथ्या क्रमांकाची कुस्ती पार्थ पाटील (कंग्राळी) विरुद्ध अध्ययन एडके (कवठेपिराण) यांच्यात होणार असून याशिवाय सीमारे ५० पेक्षा अधिक काटाजोड कुस्त्या रंगणार आहेत. आखाडा पूजन रेल्वे पोलीस हनुमंत पाटील व मधुकर नाईक यांच्या हस्ते होणार असून यावेळी सरपंच गुलाब पाटील, आमदार शिवाजीराव पाटील, माजी आमदार राजेश पाटील, माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, उपजिल्हाधिकारी प्रल्हाद हिरामणी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कुस्ती शौकीनांनी मैदानाचा लाभ घ्यावा अशी आवाहन संयोजकांच्या वतीने नेत्रपाल हडलगेकर, यल्लाप्पा पाटील, भारत पाटील, दत्ता पाटील आदींनी केले आहे.

No comments:
Post a Comment