काँग्रेस नेते गोपाळराव पाटील यांना बंधूशोक - चंदगड लाईव्ह न्युज

25 October 2026

काँग्रेस नेते गोपाळराव पाटील यांना बंधूशोक

शंकरराव पाटील

चंदगड : सी एल वृत्तसेवा

    शिवणगे (ता. चंदगड) येथील प्रगतिशील शेतकरी शंकरराव मोतीराम पाटील (वय -९१) वृद्धापकाळाने रविवारी (दि. २५) निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, सुना,  जावई, नातवंडे असा परिवार आहे. चंदगड येथील पाटील हॉस्पिटलचे डॉ. दीपक पाटील, इंजिनिअर दयानंद पाटील, उत्तम पाटील यांचे वडील तर राष्ट्रीय काँग्रेस प्रदेश कार्यकारणी सदस्य, दौलत साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील यांचे बंधू होत. निट्टूर येथील राज्य परिवहन महामंडळाचे निवृत्त अधिकारी देवेंद्र साळुंखे यांचे ते सासरे होत.

No comments:

Post a Comment