चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
तुर्केवाडी ता. चंदगड, जि. कोल्हापूर, येथील मूळ रहिवासी आणि मुंबईतील भारत को-ऑपरेटिव्ह बँक, कर्जत शाखेचे मॅनेजर नितीन नायकोजी पाटील वय 52 यांचा आज पिंपरी येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवार, दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन पाटील हे बँकेच्या कामानिमित्त कर्जत येथून पुण्याच्या दिशेने येत होते. पिंपरी रेल्वे स्थानक परिसरात त्यांची रेल्वे अपघातात प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा मोठा परिवार आहे. ते स्थानिक शिक्षक संजय नायकोजी पाटील यांचे धाकटे बंधू होते. नितीन पाटील हे आपल्या मनमिळावू, परोपकारी आणि सदैव हसतमुख स्वभावामुळे परिचित होते. सामाजिक आणि कौटुंबिक वर्तुळात त्यांचा मोठा स्नेह होता. त्यांच्या या आकस्मिक जाण्याने तुर्केवाडी गावासह संपूर्ण चंदगड तालुक्यावर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या पार्थिवावर मंगळवार, दिनांक ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ठीक ९ वाजता मूळ गावी तुर्केवाडी (ता. चंदगड) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

No comments:
Post a Comment