अल्लाबक्क्ष मदार यांचे निधन, मुस्लिम समाजावर शोककळा - चंदगड लाईव्ह न्युज

20 November 2026

अल्लाबक्क्ष मदार यांचे निधन, मुस्लिम समाजावर शोककळा

 

अल्लाबक्क्ष मदार

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

चंद्रसेन गल्ली, चंदगड येथील रहिवासी व चंदगड तालुका मुस्लिम तबलीक जमातचे चंदगड तालुकाप्रमुख अल्लाबक्क्ष आदम मदार ( वय ८५) यांचे गुरुवारी (दि. १९) रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई नातवंडे असा परिवार आहे. शुक्रवारी सकाळी दफन विधी झाली. मुस्लिम समाजातील अडीअडचणी दूर करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. चंदगड, हेरे, कोवाड, कोरज, तुर्केवाडी यासह अन्य ठिकाणच्या मुस्लिम समाजात त्यांनी सलोख्याचे संबंध ठेवून सामाजिक कार्य करून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. येथील रिअल इस्टेट व्यवसायिक हासन मदार व दौलत - अथर्व साखर कारखान्याचे कर्मचारी इकबाल मदार यांचे ते वडील होत. अल्लाबक्क्ष मदार यांच्या अंत्यविधी प्रसंगी चंदगड तालुक्यासह अन्य ठिकाणाहून मोठ्या संख्येने जनसमुदाय लोटला होता.

No comments:

Post a Comment