कागणी येथील महालक्ष्मी मंदिरात धामण साप; सर्पमित्राकडून जीवदान - चंदगड लाईव्ह न्युज

19 November 2026

कागणी येथील महालक्ष्मी मंदिरात धामण साप; सर्पमित्राकडून जीवदान

 


चंदगड / सी एल वृत्तसेवा

कागणी : येथील मध्यवर्ती वस्तीतील श्री महालक्ष्मी मंदिरात गुरुवारी दुपारी पाच फूट लांबीचा धामण साप आढळला. मंदिर परिसरात लहान मुलांचा वावर असल्याने महिलांनी तत्काळ मुलांना दूर केले. सर्पमित्र विनोद कांबळे (कागणी) यांनी घटनास्थळी धाव घेत सापाला सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. त्यांच्या तत्परतेबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.


No comments:

Post a Comment