अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, २४ वर्षीय तरुणाविरुध्द चंदगड पोलीसात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद - चंदगड लाईव्ह न्युज

17 November 2026

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, २४ वर्षीय तरुणाविरुध्द चंदगड पोलीसात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद

 


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून एका २४ वर्षीय तरुणाविरुद्ध चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

        चंदगड पोलीसातून मिळालेली माहिती अशी की, पोलिसांत दाखल तक्रारीनुसार १५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२.१५ ते १२.३० या वेळेत ही घटना घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. संशयित आरोपीने पीडीत मुलीच्या आईच्या मोबाईलवर फोन करुन मला प्रोजेक्ट करायचा आहे. तुमच्या मुलीला पुस्तक घेवून पाठवा तिला पुस्तकातील दोन कवितेचे प्रश्न विचारुन घरी पाठवतो. फिर्यादीने आपल्या मुलीला त्याच्या घरी पाठवले असता तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेवून तिच्या इच्छेविरुध त्या तरुणाने लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाइकांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंदगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक आकाशदीप भोसले करीत आहेत. 


No comments:

Post a Comment