मुरगाव तालुक्यात ‘किल्ले बनवा स्पर्धा २०२६’ उत्साहात, सौ. शारदा पाटील यांच्या किल्लेनिर्मितीचे मान्यवरांकडून कौतुक; निवासस्थानी दिली सदिच्छा भेट - चंदगड लाईव्ह न्युज

17 November 2026

मुरगाव तालुक्यात ‘किल्ले बनवा स्पर्धा २०२६’ उत्साहात, सौ. शारदा पाटील यांच्या किल्लेनिर्मितीचे मान्यवरांकडून कौतुक; निवासस्थानी दिली सदिच्छा भेट

 


पणजी : सी एल वृत्तसेवा

 गोव्याचे ऐतिहासिक महत्त्व जतन करण्याबरोबरच तरुण पिढीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, गडकिल्ल्यांचा वारसा आणि ऐतिहासिक वास्तूंबद्दल जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘किल्ले बनवा स्पर्धा २०२६’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटना, अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज आणि पुरातत्व संचालनालय, गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेअंतर्गत मुरगाव तालुक्यातील सायंकाळ येथील रहिवासी सौ. शारदा पाटील यांनी व्यक्तिगत गटात सहभाग नोंदविला आहे. त्यांनी साकारलेल्या किल्ल्याच्या उत्कृष्ट निर्मितीची दखल घेत मराठी राजभाषा निर्धार समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

यावेळी समितीचे कार्यकर्ते श्री. संजीव कडकडे, श्री. विजय हजारे, श्री. राजाराम पाटील आणि श्री. परशुराम घणाघाती यांनी सौ. शारदा पाटील यांच्या किल्लेनिर्मितीचे कौतुक केले. त्यांच्या कलागुणांचे आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, शिवकालीन इतिहासाची आवड निर्माण करणे आणि गडकोटांच्या संवर्धनाबाबत जागरूकता वाढविणे या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. सौ. शारदा पाटील यांच्या सहभागाचे परिसरातून कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment