जंगमहट्टीजवळ कार उलटून अपघात, बेळगाव तालुक्यातील युवकाचा मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

12 November 2026

जंगमहट्टीजवळ कार उलटून अपघात, बेळगाव तालुक्यातील युवकाचा मृत्यू

AI Image

चंदगड / सी एल वृतसेवा

      जंगमहट्टी गावाजवळ मेगा कंपनीसमोर रस्त्यावरून जाणारी कार अचानक रस्त्याच्या बाजूला जाऊन झाडाच्या फांद्यांना धडकून उलटल्याने झालेल्या अपघातात बेळगाव तालुक्यातील विनायक नेताजी कलिंग (रा. ज्योतीनगर, गणेशपूर, बेळगाव) यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, दि. १० नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ९.२० वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांतर्फे दाखल फिर्यादीनुसार मिळालेली माहिती अशी, फिर्यादी पप्पू गंगाराम भोसले (वय ४४, व्यवसाय चालक, रा. ज्योतीनगर, गणेशपूर, बेळगाव) हे आपले मित्र जयंत रामचंद्र कामु, विनायक नेताजी कलिंग आणि मयूर गुरु बसय्या कांबळे यांच्यासमवेत कारमधून बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरून आंबेवाडीच्या दिशेने जात होते.

जंगमहट्टी गावाजवळ मेगा कंपनीसमोर अचानक कारच्या समोर कुत्रा आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने कार रस्त्याच्या बाजूला घेतली. यावेळी रस्त्याच्या कडेला असलेली माती खचल्याने कार झाडाच्या बुंदयाला जोरात धडकून उलटली. या अपघातात विनायक कलिंग यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यांना उपचारासाठी बेळगाव येथील केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पोलीस उपनिरीक्षक श्री. गंगजे तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment