![]() |
| मोहन परशराम गोईलकर |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
५४ व्या बटालियन, SSB, बिजनी (आसाम) येथे कार्यरत असलेले भारतीय सैन्य दलाचे जवान CT/GD मोहन परशराम गोईलकर (मुळ गाव - बागिलगे, ता. चंदगड) यांचे दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांचे पार्थिव दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे पुणे विमानतळावर पोहोचणार असून तेथून चंदगड तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी बागिलगे येथे आणण्यात येणार आहे. बागिलगे या ठिकाणी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या गावी अंत्यसंस्काराची तयारी सुरु असून स्थानिक पोलीस व नागरी प्रशासनामार्फत आवश्यक ती कार्यवाही सुरु आहे. बागिलगे येथे त्यांच्या गावी शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुलगे, बहीण असा परिवार आहे.

No comments:
Post a Comment