रोशन दिवटणकर याची कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघात निवड - चंदगड लाईव्ह न्युज

16 October 2026

रोशन दिवटणकर याची कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघात निवड

 

रोशन दिवटणकर

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        वडगाव, माद्याळ (ता. कागल ) येथील रोशन सरिता राजेंद्र दिवटणकर (वय - १७) याची कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी जाहीर केलेल्या जिल्हा क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. ही निवड झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातून कौतुक होत आहे. 

    सध्या रोशन हा बेलेवाडी (काळम्मा, ता. कागल) येथील भारती विद्यापीठ संचलित आनंदराव पाटील प्रशालेच्या क्रिकेट मैदानावर सराव करत असून मुंबई येथील क्रिकेट प्रशिक्षक सागर शर्मा यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. रोशन याने जे. पी. नाईक ग्लोबल स्कूल, बहिरेवाडी (ता. आजरा) येथे प्राथमिक शिक्षण घेतले. यानंतर उच्च प्राथमिक शिक्षण गडहिंग्लज येथील साई इंटरनॅशनल स्कूलमध्ये व सेंट झेव्हियर्स आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल, कोल्हापूर येथे घेतले. सध्या तो अकरावी या वर्गासाठी देवचंद कॉलेज निपाणी येथे शिक्षण घेत आहे. तर बेलेवाडी (काळम्मा) येथे सराव करत आहे. त्याला बेलेवाडी काळम्मा प्रशालेचे मुख्याध्यापक आर. के. पाटील यांचे मार्गदर्शन तर वडील राजेंद्र दिवटणकर व आई सरिता दिवटणकर यांचे प्रोत्साहन लाभले. रोशन हा चंदगड येथील पत्रकार संदीप तारिहाळकर यांचा भाचा होय.

No comments:

Post a Comment