गडहिंग्लज, चंदगड व आजरा तालुक्यांतील पाच गावांचा समावेश; काही ठिकाणी कामे प्रगतिपथावर
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड विधानसभा मतदारसंघातील गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा या तीन तालुक्यांतील नागरिकांना महसूलविषयक कामांसाठी अधिक सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पाच तलाठी तथा चावडी कार्यालये मंजूर करण्यात आली आहेत.
या मंजूर कार्यालयांमध्ये गडहिंग्लज तालुक्यातील कसबा नूल, आजरा तालुक्यातील हत्तीवडे व मलीग्रे, तर चंदगड तालुक्यातील हलकर्णी व नागणवाडी या गावांचा समावेश आहे.
यापैकी काही कार्यालयांच्या बांधकामाची कामे सध्या प्रगतिपथावर असून, उर्वरित कार्यालयांची कामेही लवकरच सुरू होणार आहेत. त्यामुळे संबंधित गावांसह परिसरातील नागरिकांना तलाठी कार्यालयाशी संबंधित कामांसाठी दूरवर जाण्याची आवश्यकता कमी होणार आहे.
उत्पन्नाचा दाखला, सातबारा उतारा, फेरफार नोंदी तसेच विविध महसूलविषयक कामांसाठी नागरिकांना स्थानिक पातळीवरच सुविधा उपलब्ध होण्यास या कार्यालयांचा फायदा होणार आहे.
तीन तालुक्यांतील पाच गावांमध्ये ही कार्यालये उभारली जाणार असल्याने ग्रामीण भागातील महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि सुलभ होण्यास मदत मिळणार आहे. या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

No comments:
Post a Comment