चंदगड : सी एल वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी राज्य संघटनेच्या चंदगड तालुका शाखेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा किरण दत्तात्रय पाटील (रा. हडलगे) यांची बिनविरोध निवड झाली. तीन वर्ष चंदगड तालुका अध्यक्ष म्हणून ते काम पाहतील. याबद्दल संघटनेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. ते किणी व माणगाव कृषी विभाग सज्जाचे सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असून आपल्या कारकीर्दीत त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत.
चंदगड शाखेच्या नव्या कार्यकारीणीत सुधाकर मुळे व दिगंबर सूर्यवंशी (जिल्हा कार्यकारणी सदस्य), जीवन पालमपल्ले, शुभम पाटील, मारुती कन्हाळे, रत्नमाला वाडेकर (चौघेही उपाध्यक्ष), तालुका सचिव साहेबराव साबळे, खजिनदार वैदेही पाटील, गणेश गायकवाड, अतिश चव्हाण यांची सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
दैनंदिन काम करत असताना विविध समस्या निर्माण होत आहेत. या समस्यांचा संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या समस्या थेट माझ्यापर्यंत मांडाव्यात, असे आवाहन किरण पाटील यांनी केले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आजरा कृषी विभागाचे अधिकारी एस. बी. गडकरी, के. डी. ऐनापुरे यांनी काम पाहिले.

No comments:
Post a Comment