बँक ऑफ महाराष्ट्र च्या 'ग्राहक सतर्कता अभियान' चा प्रारंभ, कोवाड शाकाधिकारी मते यांचे ग्राहकांना मार्गदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

01 November 2026

बँक ऑफ महाराष्ट्र च्या 'ग्राहक सतर्कता अभियान' चा प्रारंभ, कोवाड शाकाधिकारी मते यांचे ग्राहकांना मार्गदर्शन

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कोवाड यांच्या वतीने ग्राहक सतर्कता अभियान शुभारंभ प्रसंगी उपस्थित शाखाधिकारी अविनाश मते व बँकेचे ग्राहक.

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

     बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कोवाड यांच्या वतीने बँकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या 'ग्राहक सतर्कता अभियान- २०२६' चा शुभारंभ करण्यात आला. अभियान अंतर्गत बँकेकडून ग्राहकांना मिळणाऱ्या विविध योजना व सुविधांची माहिती शाखाधिकारी अविनाश मते यांनी उपस्थित ग्राहकांना दिली. 

    या उपक्रमांतर्गत बँकेच्या कोवाड शाखा कार्यक्षेत्रात येणाऱ्या विविध गावांमध्ये जाऊन ग्राहकांना माहिती देण्यात येणार आहे. असे यावेळी शाखाधिकारी यांनी सांगितले. गुरुवार दि. २९/१०/२०२६ रोजी येथील ग्राहक सेवा केंद्र कार्यालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात अविनाश मते यांनी मार्गदर्शन करताना बँक ऑफ महाराष्ट्र ने ग्राहकांसाठी सुरू केलेल्या पंतप्रधान जीवन विमा योजना व इतर विमा योजना, अटल पेन्शन योजना, बंद खाते पुन्हा चालू करणे, आपल्या खात्याच्या ओळखीसाठी केवायसी करणे, केवायसी साठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती, पीक कर्ज योजना, पीक विमा योजना, वित्तीय समावेशित योजनांचा लाभ घेण्यासाठी काय केले पाहिजे? आपले खाते अपडेट ठेवणे, कर्ज व ठेवी योजना आदी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी सुदर्शन बामणे, कोवाड केंद्राचे माजी केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू देसाई, परसू कांबळे यांच्यासह बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment