चंदगड : सी एल वृत्तसेवा
कुदनूर ता. चंदगड येथील रहिवाशी सिद्धाप्पा मारुती शहापूरकर वय ४४ याने आपल्या राहत्या घरी परड्याकडील खोलीत छताचे लाकडी वाशाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १७ ऑक्टोबर रोजी रात्री ८.०० ते १८ ऑक्टोबर २०२६ सकाळी साडेअकरा च्या दरम्यान घडली. या घटनेची वर्दी मयत सिद्धाप्पा यांचा मुलगा समर्थ वय २१ सध्या राहणार उचगाव तालुका बेळगाव यांनी चंदगड पोलिसात दिली आहे.
याबाबत चंदगड पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, वर्दीदार समर्थ यांचे वडील सिद्धाप्पा यांचे कुदनूर येथे छत्रपती शिवाजी गल्लीत राहते घर आहे. घराच्या परड्याकडील खोलीत त्यांनी नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या करून मयत झाले. प्राथमिक तपासणी करून चंदगड येथे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेचा अधिक तपास पोहेकॉ पाटील व नाईक करत आहेत. घटनेची नोंद मयत रजि.नं.- 61/2026 बी.एन.एस.एस. 194 प्रमाणे करण्यात आली आहे.
सिद्धाप्पा यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.

No comments:
Post a Comment