कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
जय कल्मेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, किणी (ता चंदगड) यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या भाषण स्पर्धेत निट्टूर (ता चंदगड) कु. अनुजा दत्तात्रय लोहार हिने प्रथम क्रमांक पटकावला. ती कोवाड येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ( B.Sc.CS- 3) मध्ये शिकत आहे. याशिवाय बेळगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. बेळगाव येथील स्पर्धेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) काळाची गरज की भविष्यातील धोका? या विषयावर तिने भाषण केले होते. याशिवाय गेल्या काही वर्षात अनुजा हिने अनेक ठिकाणी वक्तृत्वाने अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत.

No comments:
Post a Comment