कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
खास विजयादशमीनिमित्त कालकुंद्री (ता. चंदगड) येथे मंडळ मंडळ श्री कलमेश्वर मंडळ आयोजित खुल्या रस्सीखेच स्पर्धेला क्रीडा शौकिनांचा मोठा प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत जिल्ह्यातील दिग्गज संघांनी भाग घेतला होता.
![]() |
| द्वीतीय क्रमांक |
अंतिम काटाजोड लढतीत शिवणगे (ता. चंदगड) संघाने हेब्बाळ (ता. गडहिंग्लज) संघावर ३ विरुद्ध ० गुणांनी विजय मिळवला. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत किणे (ता. आजरा) संघाने बलाढ्य यजमान कालकुंद्री संघावर विजय मिळवला.
![]() |
| तृतीय क्रमांक |
विजेत्या संघांना अनुक्रमे रोख ११ हजार, ८ हजार, ६ हजार, ४ हजार रुपये, ट्रॉफी व पदक देऊन गौरवण्यात आले. शिस्तबद्ध संघ म्हणून निट्टूर संघाची निवड करण्यात आली. याशिवाय स्पर्धेत किणी, हुंदळेवाडी, माणगाववाडी, माडवळे आदी गावच्या संघांनी भाग घेतला.
![]() |
| चतुर्थ क्रमांक |
या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले ते स्पर्धेतील हुंदळेवाडी संघात आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू सिद्धार्थ देसाई यांचाही सहभाग होता. तथापि त्यांना आपल्या संघाला विजेतेपदापर्यंत नेण्यात अपयश आले.
![]() |
| शिस्तबद्ध संघ |
यावेळी पंच म्हणून भाऊ पाटील, सुखदेव भातकांडे, प्रमोद पाटील, नारायण पाटील आदींनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मंडळ मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


.jpeg)
.jpeg)

No comments:
Post a Comment