विविध मागण्यासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा आजपासून संप सुरु, कामकाज ठप्प - चंदगड लाईव्ह न्युज

17 November 2026

विविध मागण्यासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा आजपासून संप सुरु, कामकाज ठप्प

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    वेतनवाढ मिळावी या मागणीसाठी आज (मंगळवार दि. १७) राज्यातील  न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून बेमुदत संप पुकारला आहे. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राहुल घोडके यांच्या पुढाकाराने हे आंदोलन सुरू आहे. कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने चंदगड न्यायालयातील कामकाज आज दिवसभर ठप्प झाले होते. 

    न्यायालयात दाखल होणाऱ्या प्रकरणाची वाढती संख्या, त्या तुलनेत असणारे अपुरे कर्मचारी त्यामुळे कर्मचाऱ्यांच्यावर कामाचा ताण येतो. वेतनामध्येही तफावत असल्याने हि मागणी गेल्या अनेक महिन्यापासून आजही प्रलंबित आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप सुरू ठेवणार असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणने आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप सुरू ठेवणार आहोत', असे त्यांनी नमूद केले. मात्र या संपामुळे पक्षकार नागरीकांच्यासह वकिलांची गैरसोय होत आहे. 

        या संपात न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे राहुल घोडके, प्रशांत मेटकुप्पी, केतन चोपडे, महेश पाटील, संदीप गंगधर, संजय सन्मुख, अश्विन पानारी, फारुख कागवाडे, केतन चोपडे, प्रवीण कागदे, अरविंद लोंढे संजय वीर, अमित रेडकर, परिक्षीत पवार, राघवेंद्र नाईक, विकास भोपळे प्रकाश कांबळे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते. 

No comments:

Post a Comment