कोदाळी येथील माजी सुभेदार मेजर रमेश गावडे यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

16 March 2026

कोदाळी येथील माजी सुभेदार मेजर रमेश गावडे यांना मातृशोक

 

श्रीमती भागीरथी धानू गावडे

चंदगड - सी एल वृतसेवा

कोदाळी (ता. चंदगड) येथील रमेश धानू गावडे, सुभेदार कुंडलिक गावडे व हॉटेल व्यावसायिक रविंद्र गावडे यांच्या मातोश्री श्रीमती भागीरथी धानू गावडे (वय वर्ष 84) यांचे वद्धापकाळाने सोमवार दि. १६ मार्च रोजी सायंकाळी निधन झाले. अंत्यसंस्कार विधी मंगळवार दि १७ मार्च रोजी सकाळी १० वाजता कोदाळी येथे आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही सहा मूलांचा सांभाळ करत उच्च शिक्षण दिले होते. तसेच दोन मुले सैन्यदलात वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या पश्चात चार विवाहीत मुलगे, दोन विवाहीत मुली, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

No comments:

Post a Comment