कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
बसर्गे, ता. चंदगड येथील रहिवाशी व माजी सरपंच तुकाराम भरमू बेनके वय ७५ यांचे आज रविवार दि. १५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. चंदगडचे माजी आमदार व महाराष्ट्र राज्याचे माजी रोहयो मंत्री भरमूआण्णा पाटील यांचे ते विश्वासू कार्यकर्ते म्हणून जिल्ह्यात परिचित होते. गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे अनेक वर्षे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. चंदगडच्या राजकीय वर्तुळात एक विश्वासू कार्यकर्ता, मनमिळाऊ, हसतमुख, अजातशत्रू, दिलदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बसर्गे येथील स्मशानभूमीत उद्या सोमवार दि. १६ रोजी सकाळी ९.३० (साडेनऊ) वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

No comments:
Post a Comment